Mumbai Local Train Accident Special Report:

Mumbai Local Train Accident Special Report: लोकलचा प्रवास की मृत्यूचा घाट? ; रेल्वेचा उपाय आणखी धोकादायक ठरणार?

मुंबई लोकल अपघात: रेल्वे प्रशासनाचे उपाय, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Published by :
Riddhi Vanne
Published on

दिवा आणि मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान भयंकर अपघात झाला. दोन लोकल एकमेकांशेजारून जात असताना, दरवाजातील प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या आणि प्रवासी खाली पडले. त्यात अनेक प्रवाशांचा बळी गेला. हा अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झाले. आणइ काही नवीन उपाय करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र हा आजारापेक्षा उपाय भयंकर, अशा लोकांची भावना झाली आहे. वाचूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्टेशनदरम्यान महाभयंकर अपघात झाला. ज्यात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. सकाळी प्रचंड गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडलीय. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल बाजूच्या ट्रॅकवरून विरुद्ध दिशेला जात होती.

अपघात नेमका घडला कसा?

एक लोकल कसाऱ्याकडून सीएसटीकडे जात होती

दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती

दारात लटकलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या

दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले

दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला

या भयंकर अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला

खरंतर मुंबई लोकलचा प्रवास हा रोजच्या रोज डीवघेणा बनलय. मुंबईकर लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. त्यातच आता ही घटना घडल्यामुळे लोकलच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत रेल्वेच्या प्रशासनाने काही उपाय शोधलेयत. त्यातला एक उपाय म्हणजे, लोकलच्या दरवाजांना अॅटोमेटिक बंद होणारे दरवाजे लावण्याचा

आजारापेक्षा उपाय भयंकर!

नवीन लोकल्सना ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावणार

सध्याच्या लोकल्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्याचा विचार

कल्याण-कसाऱ्यापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन करणार

कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित

ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार

कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करणार

यातला सगळ्यात भयंकर उपाय म्हणजे, लोकल्सना अॅटोमेटिक बंद होणारे दरवाजे लावणं, याबाबत राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाचा खरपूस समाचार घेतलाय. सोबतच, लोकलच्या प्रवाशांच्या वेदनाही राज ठाकरे यांनी मांडल्या आहेत. मुंबईतील प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे. गर्दीच्या वेळी तर प्रवाशांना दरवाजात उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच मधून मधून येणाऱ्या एसी लोकलमुळेही नंतरच्या साध्या लोकलवर प्रवाशांचा अतिरिक्त भार पडतो.. असं सगळं असताना, अॅटोमेटिक दरवाजे बसवले तर, प्रवाशांची काय अवस्था होईल?, याची कल्पना न केलेलीच बरी, दरवाजात लटकून प्रवास करण्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. मात्र हा प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अजून ठोस उपाय करायला हवेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com