पश्चिम रेल्वेवरील जलद लोकलची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील जलद लोकलची वाहतूक विस्कळीत

सकाळीच सकाळी पश्चिम रेल्वेवरील जलद लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळीच सकाळी पश्चिम रेल्वेवरील जलद लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळीच हा बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन फास्ट लाईनवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील जलद लोकल रखडल्या आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com