ताज्या बातम्या
मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार? प्रशासनाकडून तयारी सुरु
मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका अजून घेण्यात आलेल्या नाहीत.
मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका अजून घेण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांविषयीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून याची सुनावणी मंगळवारी, 6 मे रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? असा राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच अनेक सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना बीएलओ या पदी रुजू होण्यासाठी सांगण्यात आले आहे. लवकरात लवकर रुजू झाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.