BMC Election 2025-26
BMC Election 2025-26 BMC Election 2025-26

BMC Election 2025-26 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज, काय आहे फॉर्म्युला? वाचा एका क्लिकवर

15 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाने विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

BMC Election : 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाने विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाचा टक्का वाढवणे, तसेच पहिल्यांदाच मत देणाऱ्या तरुणांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी लवकरच एक स्वतंत्र समिती तयार केली जाणार असून ती मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी पाहणार आहे.

या जनजागृती उपक्रमात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि महाविद्यालयीन तरुणांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या आधी विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे देशातील सर्वाधिक आर्थिक क्षमतेची मानली जाणारी मुंबई महापालिका निवडणूक सर्वांच्या लक्षात आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असताना, महापालिका प्रशासनही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जोरात काम करत आहे.

मतदान केंद्रांची आखणी, ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था, मतमोजणीसाठी लागणारी ठिकाणे, कर्मचारी नियुक्ती आणि निवडणूक कामांचे प्रशिक्षण अशी अनेक कामे प्रशासनाकडून केली जात आहेत. मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या प्रकारे प्रचार करायचा, याचा निर्णय समिती घेणार आहे. यामध्ये पथनाट्य, महाविद्यालयांमध्ये संवाद कार्यक्रम, जनजागृती कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या सर्व उपक्रमांसाठी सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

थोडक्यात

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज

  • मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीचे काम नेमून दिलेली समिती करणार

  • या समितीमध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय , मुंबई महापालिकेती अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार

  • निवडणुकीपूर्वी पथनाट्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद आदी विविध योजना राबवण्याची शक्यता

  • सामाजिक संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची घेणार मदत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com