ताज्या बातम्या
मुंबई महापालिकेने कचराकराबाबत घेतला मोठा निर्णय, आता प्रत्येक घरासाठी दरमहा 'इतकं' शुल्क द्यावे लागणार
मुंबई महापालिकेने कचराकराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेने कचराकराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्ता शुल्क लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 31मेपर्यंत सूचना आणि हरकती पाठवण्याचा आवाहन महापालिकेने केले असल्याची माहिती मिळत आहे.
कचरा व्यवस्थापनावरील खर्चातही भर पडली असून निवासी इमारत, रेस्टॉरंट, हॉटेल, हॉल या सर्व ठिकाणी आता घनकचरा व्यवस्थापन शुल्क लागू केले जाणार आहे. घनकचरा वापरकर्ता शुल्क हे मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 2025मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचा मसुदा महापालिकेने तयार केला आहे.
मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क प्रस्तावित केले आहे आणि 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरासाठी दरमहा 100 रुपये शुल्क द्यावे लागणार असून हॉटेल-रेस्टॉरंटसाठी दीड हजार रु. शुल्क असणार आहे.