मोदी-बाळासाहेबांच्या पोस्टर्सची रंगली चर्चा; पोस्टर नेमके लावले कुणी?
Admin

मोदी-बाळासाहेबांच्या पोस्टर्सची रंगली चर्चा; पोस्टर नेमके लावले कुणी?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

यासर्व बॅनरमध्ये एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. गिरगांव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. फोटोमध्ये नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे झुकलेले दिसत आहे. हे पोस्टर्स नेमके कुणी लावले असा प्रश्न पडला आहे.मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र मोदी आणि बाळासाहेबांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com