ताज्या बातम्या
नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या अतिरिक्त बस सोडण्यात येणार
सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत असते.
सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत असते. थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करण्यात येते. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करतात.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील समुद्रकिनारे, तसेच पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असता हे लक्षात घेता बेस्ट उपक्रमातर्फे आज अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गावर रात्री एकूण 25 जादा बस सोडण्यात येणार आहेत.
गेट वे ऑफ इंडिया, जुहू, गोराई समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहेत.