मंत्र्यांचे दौरे मात्र पोलिसांना हार्ट अटॅक

मंत्र्यांचे दौरे मात्र पोलिसांना हार्ट अटॅक

मागील महिनाभरापासून अनेक राजकीय नेत्यांचे दौरे बोरिवली परिसरात झाले.

रिध्देश हातिम, मुंबई

मागील महिनाभरापासून अनेक राजकीय नेत्यांचे दौरे बोरिवली परिसरात झाले. यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता मात्र या सर्व बंदोबस्त चा तणावामुळे बोरवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.  त्यानंतर त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुख्यमंत्री गुरुवारी दहा वाजता महानगरपालिकेच्या आर मध्य विभागातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी येणार होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्ती तैनात करण्यात आला होता दरम्यान त्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत चौक बंदोबस्त तैनात करून सावंत रात्री उशिरा घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर लवकर येण्यासाठी ते पुन्हा निघाले असता सावंत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान त्यांना बोरिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र यानिमित्ताने पोलिसांच्या अतिरिक्त काम आणि आरोग्याच्या प्रश्न उभा राहिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com