ताज्या बातम्या
MVA :महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई पोलिसांची नोटीस | Marathi News
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. हुतात्मा चौकात आंदोलनाला हायकोर्टाती मनाई केली आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार, अशा आशयाची नोटीस मुंबई पोलिसांनी मविआच्या नेत्यांना पाठवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी रविवारी महाविकास आघाडीकडून ‘जोडे मारा’ आंदोलन केले जाणार आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही.