Ganpati Bappa Visarajn : मुंबई पोलिस गणपती विसर्जनासाठी सज्ज!
Ganpati Bappa Visarajn : मुंबई पोलिस गणपती विसर्जनासाठी सज्ज! 'या' गोष्टीवर केली बंदीGanpati Bappa Visarajn : मुंबई पोलिस गणपती विसर्जनासाठी सज्ज! 'या' गोष्टीवर केली बंदी

Ganpati Bappa Visarjan : मुंबई पोलिस गणपती विसर्जनासाठी सज्ज! 'या' गोष्टीवर केली बंदी

विसर्जनानंतर मूर्तीचे चित्रीकरण करून ते बेजबाबदार पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित करू नये,
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mumbai Police Ready for Ganpati Immersion : मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली असून पोलिसांची परवानगी नसताना कोणीही ठराविक परिसरात ड्रोन वापरू शकणार नाही. विसर्जनानंतर मूर्तीचे चित्रीकरण करून ते बेजबाबदार पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित करू नये, यासाठीही आदेश जारी करण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवली जाणार असून वॉन्टेड आरोपी किंवा अँटी सोशल एलिमेंट्सना ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. “आमची एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार आहे. जे गुन्हेगार मुंबईत सक्रिय आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, प्लेन क्लोथ टीम, बीडीडीएस टीम (बॉम्ब डिस्पोजल), पब्लिक ऍड्रेस सिस्टम अशी सर्व साधनं तैनात केली आहेत. गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः लालबाग परिसरात, तसेच चौपाट्यांवर आणि विसर्जन स्थळांवर गुप्तहेर पथके आणि गणवेशधारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत राहतील.वाहतूक नियोजनही सविस्तर आखण्यात आली आहे. लालबागचा राजा हा प्रमुख विसर्जन मार्ग असल्याने त्या रस्त्यावरील प्रत्येक जंक्शनवर वेगळे नियोजन केले गेले आहे. कंजेस्टेड भागांमध्ये वाहतूक डायव्हर्ट करण्यात आली आहे, तसेच बॅरिकेटिंग, वॉच टॉवर उभारले गेले आहेत. संपूर्ण रूटवर जंक्शन-टू-जंक्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुपरव्हिजन असेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com