मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात
Admin

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाटात भीषण अपघात झाला. तीन वाहनांती एकमेंकांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्यानं कंटेनर ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला.

या भीषण अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील उतारावर हा अपघात झाला असून दरीत कोसळलेल्या कंटेनर ट्रकमधील चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, दरीत कोसळलेल्या ट्रकच्या केबिनमधील चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तर, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com