मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आजपासून पुढील 6 महिने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

वाहनचालकांना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा येथे डावीकडे वळण घेवून एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून जाता येणार आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून तळोजा, कल्याण- शिळफाटाकडे जाणाऱ्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून उडड्राणपुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच ४८ महामार्गावरून जाता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com