Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली होती. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाला लागल्या होत्या. आता दोन लेन सुरू करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे.आता दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com