मुंबईत पावसाची प्रतीक्षा; मुंबईकर उकाड्याने हैराण

मुंबईत पावसाची प्रतीक्षा; मुंबईकर उकाड्याने हैराण

सोमवारपासून मुंबईत मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता
Published by :
Siddhi Naringrekar

सोमवारपासून मुंबईत मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता मात्र मुंबईकर उकाड्याने हैराण झाले. यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

पाऊस आणखी लांबल्यास पाणी कपातही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाऱ्यांचा वेग वाढल्याने हा संपूर्ण आठवडा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या धरणांमधील पाणीसाठाही 5 टक्क्यांच्या खाली आला आहे त्यामुळे पाणी कपातही वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com