ताज्या बातम्या
Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात आणि घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून आता मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आता मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे