मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार होती. मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही दुसऱ्यांदा स्थागित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठानं या निवडणुकीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कमल 28(2)(न) [28(2)(t)] प्रमाणे नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणुकीची निवडणूक अधिसूचना 3 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक 22 सप्टेंबर 2024 रोजी होती.
या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कळविण्यात येत की, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, 22 सप्टेंबर रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. असे त्यात सांगितले आहे.