Mega Block | Harbour Line | Transharbour Line
Mega Block | Harbour Line | Transharbour Lineteam lokshahi

Mega Block : उद्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक

10 अतिरिक्त एसी लोकल रद्द, नॉन एसी लोकल धावणार

Mega Block : मुंबई विभागातील ट्रान्स हार्बर लाईन आणि हार्बर लाईनवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेलहून सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल ते ठाणे या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (mumbai sunday mega block)

Mega Block | Harbour Line | Transharbour Line
न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचा असा राहिलाय जीवन प्रवास

हार्बर लाइन

वाशी/बेलापूर/पनवेलसाठी CSMT/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

10 अतिरिक्त एसी लोकल रद्द, नॉन एसी लोकल धावतील

रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक नाही.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com