Rain Update : मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Rain Update : मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वेसेवेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

आज सुद्धा मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे, सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आजही अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com