Vande-Bharat : मुंबई- मंगळूर मार्गिकेवर लवकरच धावणार वंदे भारत

Vande-Bharat : मुंबई- मंगळूर मार्गिकेवर लवकरच धावणार वंदे भारत

मुंबई ते मंगळूर मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरु होणार, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईमधून सध्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी याचबरोबर अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. आता भारतामध्ये आणखी वंदे भारत ट्रेनची भर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई ते मंगळूर यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत असताना, रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई- मंगळूर यामार्गिकेवर नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचा विचार आहे. यामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांची ही मागणी असल्याचे समोर आले आहे.

त्यासाठी मुंबई- गोवा आणि गोवा मंगळूर अशा दोन मार्गावर जोडल्या जाऊ शकतात. मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा आणि गोवा मंगळूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या 70 टक्के इतकी आहे. मुंबईहून मंगळूरुला पोहचण्यासाठी वंदे भारत ट्रेनचा 12 तासांचा प्रवास आहे.

मुंबई- मंगळूर या मार्गावर वंदे भारत ट्रे्न सुरु करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मुंबई ते मंगळूर या गाड्यांचा प्रवास जर वाढवल्यास केरळपर्यंत चांगला प्रतिसाद मिळू शकले असा अंदाज रेल्वे प्रशासनाने वर्तवला आहे. तसेच यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com