दसरा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

दसरा मेळाव्याच्या पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी

आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसेच या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होणार. याची दखल घेत पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली आहे. सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शनपर्यंत दादासाहेब रेगे रोडकडे वाहतूक बंद असणार आहे. वाहतूक एल. जे. रोड, गोखले रोड आणि रानडे रोडकडे वळवण्यात येणार आहे.

बाल गोविंदास मार्ग पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शनपासून सेनापती बापट मार्ग पासून एल. जे. मार्ग पश्चिमेकडे वाहतूक बंद असणार आहे. मनोरमा नगरकर मार्गाकडे ही वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपआयुक्त (मुख्यालय आणि मध्य) डॉ. राजू भुजबळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com