55 वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी
Admin

55 वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी

55 वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहतूक व्यवस्थापित करणाऱ्या पोलीस हवालदार आणि अधिकाऱ्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

55 वर्षांहून जास्त वयामध्ये आरोग्याच्या समस्या असलेले मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी राहणार आहेत. राज्यात काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Admin

वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत खबरदारी घेण्यास दलाने सुरुवात केली आहे. शहरातील वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांबाबतही मुंबई पोलीस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक विभागातील ज्या अंमलदारांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना बीपी, शुगर, दमा, दुर्धर आजार, मोठे ऑपरेशन झाले आहे अशा अंमलदारांची दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावरील कर्तव्याकरता नेमणूक करण्यात येऊ नये.

कर्तव्याकरता तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक करावी. कर्तव्य वाटप करताना जोडीने नेमणूक करावी. आवश्यक त्या ठिकाणी अंमलदारासोबत वॉर्डनची नेमणूक करावी.

कर्तव्यावरील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरता स्वच्छ आणि शुद्ध पेयजल बॉटलची व्यवस्था त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजता करण्यात यावी.

तापमानाची दाहकता लक्षात घेता सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी न चुकता डोक्यावर टोपी परिधान करावी.

कर्तव्यावरील अधिकारी/अंमलदार यांना अचानकपणे छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या झाल्यास त्यांना तात्काळ कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित असलेल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.

असे या प्रतमध्ये लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com