पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तोडली विद्यापीठाची भिंत; विद्यार्थी आक्रमक

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तोडली विद्यापीठाची भिंत; विद्यार्थी आक्रमक

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी, यासाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आली आहे. ”कलिना कॅम्पसची भिंत पाडून मुंबई महापालिका आणि विद्यापाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणे कितपीत योग्य आहे?”असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमोल माटेले यांनी विचारला आहे.

यावरुन विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींग सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही भिंत तोडण्यात आली असून आजच्या कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भित पुन्हा बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com