Mumbai University : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थगित

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थगित

मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता. मात्र आता स्थगित झाल्यामुळे यावर विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com