मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून 30 दिवस पाणीकपात
Admin

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून 30 दिवस पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे.ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचली असल्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात करण्यात येणा आहे.

या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व दरम्‍यानच्‍या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे.

या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com