ताज्या बातम्या
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
उन्हाचा कडाका वाढला आहे.
उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे. यातच आता मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रविवार 27 एप्रिल 2025रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांसाठी ही कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
घाटकोपर, विद्याविहार या एन आणि कुर्ला, टिळकनगर या एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी 26 एप्रिल 2025रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.