ताज्या बातम्या
Mumbai Water Tanker Service : मुंबईत पाणीबाणी? आजपासून टँकर असोसिएशनचा संप; कारण काय?
मुंबईत आजपासून टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे.
मुंबईत आजपासून टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे. उन्हाळा सुरु झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच आता टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. या संपामुळे आता हॉटेल्स, गृहप्रकल्प, विकासकामे, रुग्णालय या ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्यामुळे अटींमध्ये सूट मिळायला हवी. अशा त्यांच्या मागण्या आहेत. यातच विविध भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.