CM Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल
ठाकरे गटाचे विक्रोळी कन्नमवारनगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यासह शिरुर, आळंदी आणि त्या मतदारसंघातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला बोलायला येत पण मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो. निवडणुकांना आम्ही घाबरतो अशी टीका विरोधक करतात. पण निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात तुम्हीच गेला आहात ना.
तसेच ते पुढे म्हणाले की, पुढच्या अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल. बाळासाहेबांचा 80 टक्के समजकारण आणि 20 टक्के राजकारण हा विचार घेऊन आम्ही काम करत आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पंत्परधान नरेंद्र मोदी सगळे रेकॉर्ड मोडतील. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. असे मुख्यमंत्री म्हणाले.