Pune Mundhwa land Case
Pune Mundhwa land CasePune Mundhwa land Case

Pune Mundhwa land Case : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; रवींद्र तारु-दिग्विजय पाटीलांची समोरासमोर चौकशी

रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटील याची आता बावधन पोलिस समोरासमोर चौकशी करणार आहेत. दिग्विजय पाटील यांची चौकशी झाल्यानंतर बावधन पोलीस त्याला आज अटक करणार का ? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पैकी एक असलेले दिग्विजय पाटील आज बावधन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर बावधन पोलिसांनी पूर्वीपासून अटक असलेले सहाय्यक मुद्रांक निरीक्षक रवींद्र तारू यांना देखील पोलीस स्टेशनमध्ये आणला आहे. रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटील याची आता बावधन पोलिस समोरासमोर चौकशी करणार आहेत. दिग्विजय पाटील यांची चौकशी झाल्यानंतर बावधन पोलीस त्याला आज अटक करणार का ? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

अमेडीया कंपनी शासकीय जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य आरोपी पैकी एक असलेले दिग्विजय पाटील हे सध्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 38 दिवसांनी ते बावधन पोलीस स्टेशनमध्ये जवाब नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत.

सध्या बावधन पोलिसांच्या वतीने त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दिग्विजय पाटील हे तपासाला सहकार्य करत असून, त्याचा जबाब नोंदवल्यानंतर त्या जबाबच कायदेशीर विश्लेषण केले जाईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पिपरी चिंचवड शहराचे झोन टू चे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

थोडक्यात

  • पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी घोटाळा प्रकरण

  • आरोपी दिग्विजय पाटील चौकशीसाठी दाखल

  • रवींद्र तारु-दिग्विजय पाटील यांची होणार समोरासमोर चौकशी

  • बावधन पोलीस समोरासमोर चौकशी करणार

  • बावधन पोलीस दिग्विजय पाटीलसा अटक करणार?

  • पोलीस करणार रवींद्र तारु आणि दिग्विजय पाटील यांची समोरा समोर चौकशी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com