Lokshahi Marathi Rudra Exit Poll : महानगरपालिका लोकशाही मराठी- रुद्रच्या एक्झिट पोलनुसार काय म्हणतो कोकण विभागाचा Poll?
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संध्याकाळपर्यंत पुर्ण झाली. नागरिकांनी मतदानाला अधिक प्रतिसाद दिला आहे. मुंबईमध्ये 41.08 टक्के मतदान पार पडलंच. तसंच नवी मुंबईमध्ये 45.48 टक्के मतदान , कोल्हापूरात 50.85 टक्के मतदान पार पडलं आहे. इचलकंरजीमध्ये 46.3 टक्के मतदान पार पडलं. पिंपरी-चिंचवडमध्ये 40.05 टक्के तसेच 39 टक्के मतदान पार पडलं आहे.
लोकशाही मराठी आणि रुद्रने दिलेल्या Exit Poll नुसार कोकण विभागाचा Poll दिला आहे.
मुंबईत भाजपाला 80-90, शिंदे गटाला 35-40, राष्ट्रवादी अजित पवार गट 02-03 , कॉंग्रेस 22-27, उबाठा गट 60-70, शरद पवार गट 00-01, मनसे 07-12 , इतर 08-12 जागा मिळतील.
ठाणे भाजपाला 25-30, शिंदे गटाला 50-55, राष्ट्रवादी अजित पवार गट 05-08 , कॉंग्रेस 01-02, उबाठा गट 08-12, शरद पवार गट 12-15, मनसे 02-04 , इतर 05-07 जागा मिळतील.
नवी मुंबईत भाजपाला 58-62, शिंदे गटाला 44-48, राष्ट्रवादी अजित पवार गट 00-01 , कॉंग्रेस 00-00, उबाठा गट 02-03, शरद पवार गट 00-01, मनसे 00-01 , इतर 00-01 जागा मिळतील.
मिरा- भाईंदर भाजपाला 50-55, शिंदे गटाला 25-30, राष्ट्रवादी अजित पवार गट 02-03 , कॉंग्रेस 08-10, उबाठा गट 05-07, शरद पवार गट 01-02, मनसे 00-01 , इतर 03-04 जागा मिळतील.
वसई- विरारमध्ये भाजपाला 40-50, शिंदे गटाला 02-03, राष्ट्रवादी अजित पवार गट 01-02 , कॉंग्रेस 05-06, उबाठा गट 04-05, शरद पवार गट 00-00, मनसे 00-01 , इतर 45-55 जागा मिळतील.
कल्याण- डोंबिवलीत भाजपाला 45-50, शिंदे गटाला 50-55, राष्ट्रवादी अजित पवार गट 00-01 , कॉंग्रेस 01-02, उबाठा गट 10-15, शरद पवार गट 00-01, मनसे 04-06 , इतर 02-05 जागा मिळतील.
उल्हासनगरात भाजपाला 28-32, शिंदे गटाला 35-40, राष्ट्रवादी अजित पवार गट 04-08 , कॉंग्रेस 01-02, उबाठा गट 02-04, शरद पवार गट 00-00, मनसे 04-01 , इतर 04-08 जागा मिळतील.

