Municipal Corporations Elections 2026 Actor Shashank Ketkar Shares Video Of Garbage From Thane
Municipal Corporations Elections 2026 Actor Shashank Ketkar Shares Video Of Garbage From Thane

Shashank Ketkar Video : मतदान केल्यानंतर शंशाक केतकरने टोचलं सरकारचे कान, म्हणाला “कुणीही निवडून आला तरी..."

मराठी अभिनेता शशांक केतकरनेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्याला एक वेगळाच अनुभव आला. ज्या शाळेत मतदानासाठी गेला, त्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग दिसल्याने तो अस्वस्थ झाला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shashank Ketkar post: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत असून प्रचाराचा धुरळा शांत झाल्यानंतर मतदार निर्णय घेत आहेत. या प्रक्रियेत सामान्य नागरिकांसोबतच अनेक कलाकारही मतदानासाठी बाहेर पडले आहेत.

मराठी अभिनेता शशांक केतकरनेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्याला एक वेगळाच अनुभव आला. ज्या शाळेत मतदानासाठी गेला, त्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग दिसल्याने तो अस्वस्थ झाला. या दृश्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शशांक केतकर नेहमीच सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका मांडतो. यावेळी त्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “कोण निवडून येईल यापेक्षा रोजच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणी लक्ष देणार का?” असा सवाल त्याने उपस्थित केला.

मतदानाच्या दिवशीच अशा प्रकारची अस्वच्छता दिसणं ही खेदाची बाब असल्याचं त्याने सांगितलं. ही केवळ भावना नाही, तर वास्तव असल्याचं नमूद करत नागरिक आणि प्रशासन दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं तो म्हणाला. या व्हिडीओमुळे स्वच्छतेसारख्या साध्या पण महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

थोडक्यात

• राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरू
• प्रचाराचा धुरळा शांत झाल्यानंतर मतदार अंतिम निर्णय घेत आहेत
• सामान्य नागरिकांसह कलाकारांचाही मतदानात सक्रिय सहभाग
• लोकशाही प्रक्रियेत कलाकारांनी बजावला आपला हक्क

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com