BMC Election
BMC ElectionBMC Election

BMC Election : महापालिका निवडणुकांचा मुहूर्त जवळ? आचारसंहितेबाबत बड्या मंत्र्यांनी दिला महत्त्वाचा अंदाज

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळानंतर सर्वच पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. आता महापालिका निवडणुका नेमक्या कधी लागणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळानंतर सर्वच पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. आता महापालिका निवडणुका नेमक्या कधी लागणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. सरनाईक यांच्या मते, महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जानेवारीच्या 15 ते 20 दरम्यान लागू होऊ शकते, तर निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पक्षांना तयारीसाठी काही आठवडे मिळतील.

विरोधकांना सरनाईकांचा टोला

सरनाईक म्हणाले की, शिवसेना वर्षभर जनतेत काम करते, निवडणुका कोणत्याही दिवशी लागल्या तरी आम्ही तयार असतो. कोकणातील भाजप-राष्ट्रवादी नेत्यांच्या वादांवर ते म्हणाले, कार्यकर्ते तळागाळात नशीब आजमावत असतात, काही ठिकाणी मैत्री तर काही ठिकाणी स्पर्धा असते.

ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला

ठाणे जिल्हा हा दिवंगत आनंद दिघे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून, सर्व महानगरपालिकांवर भगवा फडकवू अशी सरनाईकांची घोषणा.

निवडणुकांतील पैसेवाटपावर प्रतिक्रिया

मनसेच्या आरोपांवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राज्यभर फिरून सर्वाधिक सभा घेणारे फडणवीस, पवार आणि शिंदे होते. विरोधी पक्षातील मोठे नेते प्रचारात उतरले नाहीत, म्हणून कार्यकर्ते हतबल झाले. आम्ही मात्र कार्यकर्त्यांना पाठबळ दिले, असे ते म्हणाले आहोत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com