Municipal school | Shiv Sena corporator | Education Board
Municipal school | Shiv Sena corporator | Education Board team lokshahi

शिवसेना माजी नगरसेवकांसह महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी पायी चालत गाठलं शिक्षण मंडळ कार्यालय

शिक्षण मंडळ अधिकाऱ्याचा पुष्गुच्छ देत केला सत्कार
Published by :
Shubham Tate
Published on

Municipal school : शाळा सुरू होवून तीन महिने झाले. मात्र, अद्यापही आम्हाला गणवेश नाही, पुस्तकं नाहीत, आम्हाला ही सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे अशी मागणी करत आज पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिवसेना माजी नगरसेवक कैलाश शिंदे यांनी आज पत्रिपुलापासून शिक्षण मंडळ कार्यालय पायी चालत गाठले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पुषगुच्छ देत उपहासात्मक सत्कार केला. (Municipal school students along with former Shiv Sena corporators reached the Education Board office on foot)

Municipal school | Shiv Sena corporator | Education Board
टोमॅटो फ्लूचा लहान मुलांना धोका, अशी घ्या काळजी

पालिका शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पालिका शाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून अद्यापही शालेय गणवेश अन्य शालेयपयोगी वस्तूचे वाटप केले नसल्याने, विद्यार्थ्यांना वीणा गणवेश किंवा जुने गणवेश घालत शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी निवेदने देवून ही काहीच कार्यवाही झाली नसल्याने पालकवर्गात संताप आहे.

Municipal school | Shiv Sena corporator | Education Board
Office Etiquette : आजच तुमची ही वागणूक बदला, अन्यथा ऑफिसमध्ये व्हाल सर्वांचे शत्रू

आज शिक्षण विभागाच्या अनागोंदी कामकाजाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक कैलाश शिंदे यांच्यासह पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी कल्याण पूर्व पत्रिपुलापसून पायी चालत कल्याण पश्चिम सहजानंद चौक येथील शिक्षण मंडळ कार्यालय गाठलं. शिक्षण मंडळाकडे तत्काळ गणवेश व शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप करा अशी मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळामधील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देत उपहासात्मक सत्कार केला.

तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com