पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेत मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट स्टाईल कॉपी
रिध्देश हातिम|मुंबई: तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट नक्कीच पाहिला असेल. त्या चित्रपटात मुन्नाभाईची भूमिका संजय दत्तने उत्तम पध्दतीने पार पडली आहे. संजय दत्त हा मेडिकल परीक्षेत पास होण्याकरता कानात हेडफोन लावून दुसऱ्या बाजूला एका डॉक्टरला बसून परीक्षेत कॉपी करून पास होतो. अगदी तशीच काॅपी हवालदारांच्या लेखी परीक्षे दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा सुरू होते. मुंबईत अनेक जागे सेंटर होते त्यातील गोरेगाव येथील उन्नत नगर महापालिका शाळेत परीक्षा सुरू होती. दरम्यान यामध्ये एका विद्यार्थीचे वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. त्याची तपासणी केली असता त्याच्या हातावर एक डिवाइस सापडला आणि त्या डिवाइसमध्ये एक सिमकार्ड सापडले तसेच त्याच्या कानात मायक्रोफोन ही सापडले. अटक विद्यार्थीचे नाव युवराज धनसिंग जारवाल (19) असून तो औरंगाबाद येथे राहतो तसंच पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.