Lokshahi Marathi Sanwad 2025 | Murlidhar Mohol : दिल्लीतून आपला महाराष्ट्र कसा दिसतो, मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले...
लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर यावेळी येथे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
दिल्लीतून दिसणारा महाराष्ट्र कसा ? "खरंतर या महाराष्ट्रान खूप काही देशाला दिलं आहे. आज आर्थिक राजधानी देशाची जी आहे मुंबई आहे ती महाराष्ट्रात आहे त्यामुळे महाराष्ट्राचं महत्त्व काय असेल एकाच वाक्यात पूर्ण होऊ शकत नाही .पण तरी महाराष्ट्र हा सहकाराच्या दृष्टीने समृद्ध आहे. हा येथील राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने देशामध्ये पाहिलं जातं.मी या महाराष्ट्रातून जातो त्याची एक मोठी संस्कृती राजकीय संस्कृती असेल एक नेतृत्वाच एक मोठं मालिका दिल्लीमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रातून मी येतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा निश्चितपणे माझ्याशी जो समोरची व्यक्ती असेल किंवा काय त्याचा दृष्टिकोन बदलतो.महाराष्ट्र एक चांगला प्रदेश आहे एक प्रगतशील राज्य म्हणून आणि भविष्यात विकासाच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करणारे एक राज्य म्हणून पंतप्रधान असतील माननीय अमित भाई असतील एकूणच राजकीय व्यवस्था म्हणून आज महाराष्ट्राच स्थान खूप वेगळं आणि चांगल आहे."