Murlidhar Mohol
Murlidhar Mohol

मुरलीधर मोहोळांनी पुण्याचं मैदान मारलं! मंत्रिपदासाठी लागली वर्णी; माध्यमांशी बोलताना म्हणाले, "नरेंद्र मोदी यांचा..."

पुणे लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार आहे. त्यांचे कुटुंबीय शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Narendra Modi Oath Ceremony Latest Update : एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकसेवा आघाडी आज सायंकाळी साडेसात वाजता केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तसच एनडीएत असणाऱ्या अनेक खासदारांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार आहे. अशातच पुणे लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार आहे. मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं त्यांचे कुटुंबीय दिल्लीत शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.

माध्यमांशी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

आता नवीन जबाबदारी मिळत आहे. माझं पुणे असेल, महाराष्ट्र आणि देशाची सेवा यानिमित्ताने करता येणार आहे. ही नवीन संधी मला जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे खूप चांगलं काम करायचं आहे. नरेंद्र मोदी यांचा २०४७ चा विकसित भारताचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यासाठी मी मनापासून खूप काम करणार आहे. मील प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे. पुणेकरांनी आणि माझ्या पक्षनेतृत्त्वाने जो विश्वास व्यक्त केला, तो सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र प्रामाणिकपणे देशाची सेवा करेन.

पहिल्यांदाच खासदार झालेले भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघात मोहोळ यांनी महाविका आघाडीचे उमेदवरा रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार असल्यानं त्यांचे कुटुंबीय दिल्लीत शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com