मोठी बातमी! महाविकास आघाडी 'राष्ट्रवादी' शिवाय लढवणार निवडणूक?

मोठी बातमी! महाविकास आघाडी 'राष्ट्रवादी' शिवाय लढवणार निवडणूक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शरद पवार व अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले. मात्र तरी देखील शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठका होत असल्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होत असल्या समोर येत आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडी 'राष्ट्रवादी' शिवाय लढवणार निवडणूक?
Devendra Fadnavis on Gadchiroli : गडचिरोलीच्या पायाभूत विकासासाठी प्रयत्नशील - फडणवीस

दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नसल्याने काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने ही शक्यता फेटाळली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com