ताज्या बातम्या
Mumbai | इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात मविआची पत्रकार परिषद
मुंबईत होणाऱ्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद ग्रँड हयात येथे होणार आहे.
मुंबईत होणाऱ्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर, 30 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद ग्रँड हयात येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मविआचे इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
अशी असेल 'इंडिया आघाडी'ची बैठक...
31 ऑगस्ट 2023
सायंकाळी 6 वाजता - बैठकीसाठी आलेल्या नेत्याचं स्वागत
6.20 ते 8.30 - अनौपचारिक बैठक
रात्री 8.30 वाजता - डिनर डिप्लोमसी
1 सप्टेंबर 2023
सकाळी 10.30 ते दुपारी 2 - इंडिया आघाडीची बैठक
दुपारी 2 वाजता - लंच
सायंकाळी 3.30 वाजता - पत्रकार परिषद