नाभिक समाजाचं आज राज्यव्यापी आंदोलन
नाभिक समाजाकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळासाठी नाभिक समाज आक्रमक झाले आहेत.
आझाद मैदानात आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी
यासोबतच उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांच्यावर सेना महाराजांचा फोटो वापरावा, संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा.
तसेच कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी या मागण्यांसाठी नाभिक समाजाकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी नाभिक समाजाचे आंदोलन आहे.