नाचणीचे आंबील आहे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर; जाणून घ्या रेसिपी आणि फायदे
नाचणीचे आंबील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाचणीच्या आंबिलाचे अनेक फायदे आहेत. नाचणीचे आंबील हे लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
नाचणीचे आंबील कसे बनवावे?
नाचणीचे पीठ रात्रभर थोड्या पाण्यामध्ये भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे नाचणीचे मिश्रण गॅसवर थोड्यावेळ गरम करुन चांगले शिजवा. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, लसूण, मिरची घालावी. हे सर्व गुठल्या न होता व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. शिजल्यानंतर गॅस बंद करुन एका ग्लासमध्ये हे पीठ घेऊन त्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे ताक घालावे. तुम्हाला आवडत असल्यास कोथिंबीर, जिऱ्याची फोडणी देऊ शकता.
नाचणीच्या आंबीलचे फायदे
नाचणीचे आंबील लहान मुलांसाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यास मदत करते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते
नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
हाडे मजबूत होतात.
पचनक्रिया सुधारते.
नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.