Battis Shirala : यंदाही जगप्रसिद्ध बत्तीस शिराळातील नागपंचमी साध्या पद्धतीने  साजरी

Battis Shirala : यंदाही जगप्रसिद्ध बत्तीस शिराळातील नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळयातील नागपंचमी ही जिवंत नागाची पूजेसाठी प्रसिद्ध होती पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने गेल्या काही दिवसापासून प्रतीकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते.
Published by :
Team Lokshahi

संजय देसाई, सांगली

जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळयातील नागपंचमी ही जिवंत नागाची पूजेसाठी प्रसिद्ध होती पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने गेल्या काही दिवसापासून प्रतीकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते. पण यंदाही जिवंत नागा ऐवजी नागाच्या प्रतिमा पूजन करुण साजरी करण्यात आली, न्यायालयाच्या निर्णया नुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडत आहे, परंतु पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळा मध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते.. यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने सांगितले नागाची पूजा करत होते, त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळी पासून ही परंपरा 32 शिराळा मध्ये सुरू झाली. ही नाग पंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. शिराळ्याच्या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांनमधे जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा  न्यायालयाच्या निर्णया नंतर खंडित झाली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी अशी भावना शिराळकरांनी केली आहे.

नागाला आम्ही भाऊ मानतो. त्यासाठी आम्ही उपवास करतो नाग आमचे रक्षण करतो. 2002 पासून आम्ही नागाच्या प्रतिमेची पूजा करत आलो आहोत, सध्या बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी मिळाली आहे, त्याच पद्धतीने आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी  ग्रामस्थ करत आहेत. शिराळात होणार्‍या नागपंचमी उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीत पार पडावा या करिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर या शहरातून प्रतीकात्मक नागाची भव्य मिरवणूक ही निघते त्यासाठी मिरवणूक मार्गा ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे, 4 वाच टॉवर ठेवण्यात आले आहेत. 16 व्हिडिओ कॅमेरेद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी होण्यासाठी प्रशासन कंबर कसलेली पाहायला मिळत आहे

Battis Shirala : यंदाही जगप्रसिद्ध बत्तीस शिराळातील नागपंचमी साध्या पद्धतीने  साजरी
Nag Panchami 2022 : नागपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com