ताज्या बातम्या
Nagpur: नागपुरात मारबत उत्सवाला सुरूवात, मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी
उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात अखेर मारबत उत्सवाला सुरूवात झाली आहे. काळी मार्बत म्हणजे दुर्जनाच प्रतीक तर पिवळी मार्बत देवीच रूप अशी मान्यता आहे.
उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात अखेर मारबत उत्सवाला सुरूवात झाली आहे. काळी मार्बत म्हणजे दुर्जनाच प्रतीक तर पिवळी मार्बत देवीच रूप अशी मान्यता आहे. बैलपोळानंतर तान्हा पोळा येतो, त्या दिवशी हा मारबत काढला जातो. समाजातील वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करणे आणि चांगल्या विचाराचे स्वागत करायचे याचं प्रतीक म्हणुन या उत्सवाकडे पाहिल्या जाते.
जवळपास 144 वर्षापासुन हा उत्सव फक्त नागपुरात साजरा केला जातो त्यामुळे या उत्सवात मोठ्या उत्साहात लोकांनी सहभाग पाहायला मिळतो. मारबत उत्सवाला ऐतिहासिक पौराणिक तसेच धार्मिक महत्व आहे. पोळ्याच्या चार दिवसांपुर्वी स्थापन झालेल्या मारबतची आज शहरातून भव्य मिरवणूक काढून एकत्र मिलन होणार आहे. तर शहराच्या बाहेर नेऊन ते जाळले जातात. नागपूरात या उत्सवाला विशेष महत्व आहे.