नागपुरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण
Admin

नागपुरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण

नागपुरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण करण्यात आले आहे.

नागपुरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण करण्यात आले आहे. नागपुरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योजक गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अर्थात एनसीआयचं लोकार्पण झालं.एनसीआय हे डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान ट्रस्टतर्फे संचालित होणार आहे. या रुग्णालयात रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार तर लहाण मुलांवर मोफत उपचार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com