ताज्या बातम्या
Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात एका जखमीचा मृत्यू
नागपूरमध्ये दोन गट समोरासमोर आल्याने दगडफेक झाली.
नागपूरमध्ये दोन गट समोरासमोर आल्याने नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतले.
यामध्ये आता नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा मृत्यू झाला आहे.अन्सारी यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज 6 दिवसांनंतर इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.