Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन तापलं! नानांनी मांडल्या परभणी-बीडच्या घटना, ज्याने अपमान केला तो...- फडणवीसांच प्रत्युत्तर

Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन तापलं! नानांनी मांडल्या परभणी-बीडच्या घटना, ज्याने अपमान केला तो...- फडणवीसांच प्रत्युत्तर

नागपूर हिवाळी अधिवेशनात नाना पटोलेंनी परभणी-बीडच्या घटनांवर सरकारला उत्तर देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, संविधानाचा अपमान सहन न करण्याचे आवाहन.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे नागपूरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांचा परिचय करून दिला.

नाना पटोलेंनी मांडलेला विषय

नाना पटोलेंनी यावेळी आपले मुद्दे मांडत असताना सुरुवातीलाच परभमीमधील झालेली घटना आणि बीडमध्ये झालेल्या घटनेवर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने उत्तर देण्याची तयारी करवी कारण नवीन सरकार स्थापन झाल्यावर या घटना झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता परभणीत मृत्युमुखी पडला, त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाना पटोलेंना नियमांची आठवण करुन देत म्हणाले की, आपल्याला नियमांची जाणीव आहे, आपण स्वतःच म्हणालात की शोक प्रस्ताव असताना हे विषय घेता येणार नाहीत त्यामुळे राहुल नार्वेकर यांना नाना पटोलेंना बसण्याची विनंती केली.

काय म्हणाले नाना पटोले

नाना पटोले पुन्हा म्हणाले, की मी तुम्हाला मदतच केली, या घटना सरकार अस्तित्वावर घडल्या आहेत. पूर्ण राज्यात हाहाःकार माजला आहे. आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.... आंबेडकरी विचारांची जनता हवालदिल झाली आहे. मला कामकाजाची जाणीव आहे, मात्र सरकारने यावर उत्तर देण्याची तयारी दाखवावी... कारण ही गंभीर बाब आहे. लोकांमध्ये तीव्र चीड आहे.... मात्र मी विनंती करतो की सरकारने भूमिका मांडावी, असं नाना पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच प्रत्युत्तर

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे.... विधानसभा अध्यक्ष जो दिवस नेमून देतील, त्या दिवशी, आपण पूर्ण चर्चा करु... कारण दोन्ही घटना गंभीर, आपण त्यावर कारवाई काय केली तेही बघू.... परभणीच्या घटनेच्या संदर्भात आवाहन आहे, की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही... ज्याने अपमान केला तो मनोरुग्ण आहे, तरीही कारवाई झाली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com