पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. नाव बदलण्यासंदर्भातील गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.

या नावे बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक, आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com