चिंचवडमधून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर
Admin

चिंचवडमधून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे नाना काटे आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले राहुल कलाटे यांनाही बैठकीत बोलावलं असल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. मध्यरात्री बराचवेळ चर्चा झाली, मात्र पवारांनी या दोघांपैकी कोणालाच उमेदवारीबाबत स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं. आज अखेर जयंत पाटलांनी ट्वीट करुन नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. 

ट्विट करुन जयंत पाटील म्हणाले की, “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”. असे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता अश्विनी जगताप विरूद्ध नाना काटे अशी लढत होणार आहे. आज सकाळी पुन्हा नाना काटे यांनी अर्ज भरण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली असून पिंपरी चिंचवड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाना काटे अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com