Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

पुणे पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; 'हा' नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता

पुण्यातील पोटनिवडणुकांची चर्चा राजकारणात चांगलीच रंगली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील पोटनिवडणुकांची चर्चा राजकारणात चांगलीच रंगली आहे. या निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणीदेखील रमेश बागवे यांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनी तेथे जाण्याचे टाळले. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. मात्र बागवे यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे आता बागवे भाजपात जाण्याची शक्यता आहे.

बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हेदेखील तीन टर्म काँग्रेसचे नगरसेवक आहेत. शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com