Nana Patole Press Conference
Nana PatoleLokshahi

Nana Patole: नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात; पत्रकार परिषदेत म्हणाले, "नरेंद्र मोदी भ्रष्ट लोकांचे सरदार..."

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Published by :

Nana Patole On Narendra Modi : रवींद्र वायकर यांना क्लीन चीट दिली आहे. यात असं म्हटलंय की, मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल करण्यात आली, यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, वायकर ज्यावेळी लोकसभेचे उमेदवार झाले, त्यावेळीच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मोदी सरकारबद्दल ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेल्यावर वॉशिंग मशिनमध्ये धुतलं जातं. भ्रष्ट लोकांचा सरदार देशात कोण असेल, तर ते नरेंद्र मोदी आहेत. हे आता देशाच्या लोकांना कळलं आहे, असं म्हणत कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिक्षाभूमी प्रकरणाबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे? यावर बोलताना पटोले म्हणाले, कोट्यावधी लोकांची भावना दिक्षाभूमीला जोडली आहे. सरकार तिथे अशाप्रकारे स्ट्रक्चर करत असेल आणि तेथील आस्थेला धक्का लागत असेल, तर त्याला विरोध होणारच. म्हणून जनभावना आणि आस्था यो दोन्ही गोष्टींचं तालमेल ठेऊन तिथला विकास व्हावा, ही आमची भूमिका आहे. सरकार जनभावना आणि आस्थेला किंम्मतच देत नाहीत. भाजप मन की बात करणारं सरकार आहे. हे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि आस्थेला त्यांच्याकडे कोणतीही किंमत नाही. ते आपण गेले दहा वर्ष पाहतोय. ज्या घटना दिक्षाभूमीवर झाल्या, हा त्याचाच परिणाम आहे.

सूर्याने जशी कॅच घेतली आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बाहेर काढलं, तसच दोन वर्षापूर्वी मी खेळाडू बाहेर नेले आणि विकेट घेतली, असं मुख्यमंत्री एकना शिंदे म्हणाले होते, यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, आनंद व्यक्त करा. आता ७० दिवसानंतर खरा सामना सुरु होणार आहे. तो तर लपवाछपवीचा होता. आता तर जनतेच्या दरबारात आहे. तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे. त्यामुळे खरं उत्तर जनताच देणार आहे. ज्या मुख्यमंत्र्याला जनतेची काळजी नाही, मुठभर उद्योगपतींचं भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे. अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहेत. जे सरकारच अदानीसाठी काम करतंय, त्यांची कॅच जनताच घेणार आहे.

मी ग्रामिण भागातील आहे. त्यामुळे ग्रामिण आणि शहरी असा भेदभाव मला करायचा नाही. भारताच्या संघात. भविष्यात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत. आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी, हे आमचं स्वप्न आहे. म्हणून मी या क्रिकेटच्या मैदानात आलो आहे. निवडणूक लढायची की नाही, तो निर्णय येत्या आठवड्यात घेण्यात येईल. वर्ल्डकप देशाची शान असते. वर्ल्डकप खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्डकप आपल्या देशाला कायम मिळत राहावा, हे स्वप्न आम्हीही बघितलं पाहिजे, त्यासंदर्भात कृतीही केली पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com