Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

अजित पवारांकडे 145चा आकडा असेल तर मुख्यमंत्री बनावं - नाना पटोले

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर नाना पटोले यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित पवारांकडे 145चा आकडा असेल तर मुख्यमंत्री बनावं. त्याला मी बनतो, मी बनतो, असे म्हणायचे काही कारण नाही. मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर काय? असे ते म्हणाले.

Nana Patole
... तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात -रावसाहेब दानवे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com