Nana Patole : कितीही मोठा दिग्गज असेल, इथं नरेंद्र मोदी जरी उमेदवार असते तरी ते आज निवडणूक हरले असते

Nana Patole : कितीही मोठा दिग्गज असेल, इथं नरेंद्र मोदी जरी उमेदवार असते तरी ते आज निवडणूक हरले असते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या या पाचही निवडणुकांमध्ये पाचही जागा निवडून येतील. ज्या पद्धतीने 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या आणि भाजपाच्या सरकारने संविधानिक व्यवस्थेचं खात्मा करण्याचा प्रयत्न जो त्यांनी चालवलेला होता. त्याच्याविरोध जनतेमध्ये आहे.

यासोबतच नाना पटोले पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं, युवकांना फसवलं, बेरोजगारांना फसवलं, गरीब माणसाला फसवलं. त्याच्या बदला लोक मतदानाच्या रुपानं घेणार. त्या पद्धतीचा कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे. जनतेनं ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे. जेव्हा जनता ही निवडणूक अंगावर घेते याचा अर्थ की सत्तेच्या विरोधातच त्याचे मतदान होते. आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळतेय.

जेव्हा जनतेनी मतदानाचा कौल आणि मतदानाचा निर्णय घेतलेला आहे. ही निवडणूक जनतेनं अंगावर घेतलेली आहे. त्याच्यामुळे कितीही मोठा दिग्गज असेल इथं नरेंद्र मोदी उमेदवार राहिले असते तरी ते आज निवडणूक हरले असते. अशी परिस्थिती आज आहे. असे नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com